Header Ads

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण

उस्मानाबाद-  एका 17 वर्षीय मुलीस (नाव- गाव गोपनीय) लग्नाचे आमीष दाखवून तीच्या राहत्या घरुन एका तरुणाने दि. 04.09.2020 रोजी 15.00 वा. तीचे अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या वडीलाच्या प्रथम खबरेवरुन संबंधीत तरुणाविरुध्द भा.दं.सं. कलम- 363, 366 गुन्हा नोंदवला आहे.

जुगार विरोधी कारवाई

उमरगा: जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन उमरगा पो.ठा. च्या पोलीसांनी आज दि. 05.09.2020 रोजी उमरगा शहरात दोन ठिकाणी छापे मारले. यात उमरगा बसस्थानक जवळील प्रभात हॉटलेच्या मागे अमीन चॉद पटेल, रा. कोळनुर (पां.), ता. लोहारा हा कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 900/-रु. बाळगलेला आढळला. तर दुसऱ्या घटनेत पतंगे रोडच्या बाजुस एका गाळ्यासमोर रणजित सुधाकर पाटील, रा. शिवपुरी कॉलनी, उमरगा हा कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 1,145/-रु. बाळगला असतांना पथकास आढळला.यावरुन नमूद 2 व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नाकाबंदी दरम्यान 164 कारवाया- 34,600 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त

उस्मानाबाद  - कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. 04.09.2020 रोजी नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत 164 कारवाया करण्यात आल्या असुन त्यातून 34,600 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.

No comments