Header Ads

कळंब : अल्पवयीन मुलीचे अपहरण कळंब: एक 16 वर्षीय तरुणी (नाव- गाव गोपनीय) महाविद्यालयीन प्रवेश घेण्यासाठी तीच्या भावासोबत दि. 07.09.2020 रोजी खेडेगावातून कळंब येथे आली होती. गावी जाण्यास उशीर झाल्याने ते दोघे बहीन- भाऊ भावाच्या शहरातच राहणाऱ्या मित्राकडे रात्रभर मुक्कामास थांबले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ती तरुणी तीच्या भावास तेथे आढळली नाही. यावर भावाने मित्राकडे विचारपुस केली असता त्याने, “तुझी बहीन गावाकडे निघुन गेली आहे.” असे सांगीतले. यावर भावाने तीचा शोध नातेवाईकांकडे, गावात घेतला परंतु काही उपयुक्त माहिती मिळाली नाही. यावरुन बहीनीचे अपहरण त्या मित्राच्या भावाने केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या भावाने दिलेल्या प्रथम खबरेवरुन त्या संबंधीत तरुणाविरुध्द भा.दं.सं. कलम- 363 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments