Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल


वाशी: विकास दत्तात्रय गपाट व धनंजय गपाट, दोघे रा. इंदापुर, ता. वाशी या दोघा भावांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरून दि. 15.09.2020 रोजी 09.30 वा. सु. इंदापुर येथील मारुती मंदीर चौकात गावकरी- ओमराज नरहरी माळी यांसह त्यांच्या आई- वडीलांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या ओमराज माळी यांनी दि. 17.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


उमरगा: सामाईक शेतबांधावर जनावरे बांधल्याच्या कारणावरुन अर्जुन बाबुराव लोहार व कावीरा अर्जुन लोहार, दोघे रा. माडज, ता. उमरगा यांनी दि. 16.09.2020 रोजी 17.00 वा. सु. नातलग- ज्ञानोबा शंकर लोहार यांना मांडज येथील त्यांच्या शेतात शिवीगाळ करुन काठीने मारहान केली.  या मारहाणीत ज्ञानोबा लोहार यांचा उजवा हात मोडला. अशा मजकुराच्या ज्ञानोबा लोहार यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 325, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 17.09.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments