तुळजापूर : निष्काळजीपणे रस्त्यात वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा दाखलतुळजापूर: संतोष पोमा चव्हाण, रा. इंदिरानगर तांडा, हंगरगा (नळ), ता. तुळजापूर यांनी आपला ॲटोरिक्षा क्र. एम.एच. 25 एम 769 हा दि. 18.09.2020 रोजी 11.30 वा. नळदुर्ग बसस्थानका समोरील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर वाहतुकीस अडथळा व धोका होईल अशा स्थितीत मध्यभागी उभा केला. यावरुन पोलीस नाईक- विजय सुंटनुरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 283 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाई

परंडा: अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन परंडा पो.ठा. च्या पोलीसांनी काल दि. 17.09.2020 रोजी वागेगव्हाण, ता. परंडा येथे दोन ठिकाणी छापे मारले. यात वागेगव्हाण परिसरात परसुराम ऐडबा सौंदळे, रा. वागेगव्हाण हा देशी दारुच्या 10 बाटल्या (किं.अं. 600/-रु.) विनापरवाना बाळगलेला आढळला. तर दुसऱ्या घटनेत मुरलीधर त्रिंबक चव्हाण हा वागेगव्हाण येथील आपल्या घरासमोर देशी दारुच्या 10 बाटल्या (किं.अं. 500/-रु.) विनापरवाना बाळगला असतांना आढळला. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद दोघांविरुध्द म.दा.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 


No comments