Header Ads

कळंब : दुहेरी हत्याकांडातील तीन आरोपी अटकेतस्थानिक गुन्हे शाखा: पारधी वस्ती, देवधानोरा, ता. कळंब येथे दि. 06.09.2020 रोजी 14.00 वा. सु. शिवाजी पवार व त्यांचा मुलगा- संतोष या दोघांचा नातेवाईकांनी खुन करुन दुसरा मुलगा- दिनकर यासह शिवाजी पवार यांचा पुतण्या- तुकाराम यांना गंभीर जखमी केले होते. यावरुन शिराढोण पो.ठा. गु.र.क्र. 143 / 2020 हा भा.दं.सं. कलम- 302, 307 अन्वये दाखल आहे.
            गुन्हा तपासात स्था.गु.शा. च्या सपोनि- श्री आशिष खांडेकर यांसह सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- तानाजी माळी, भागवत झोंबाडे, धनंजय कवडे, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे यांच्या पथकाने गोपनीय खबरेच्या आधारे दि. 09.09.2020 रोजी कळंब परिसरातून गुन्ह्यातील आरोपी- 1) दशरथ शिवाजी शिंदे उर्फ आप्पा 2) बाळू शहाजी शिंदे उर्फ पप्पू, दोघे रा. मांडवा 3) राहुल गणेश पवार, रा. देवधानोरा, ता. कळंब यांना ताब्यात घेउन गुन्ह्या प्रसंगी वापरलेली डिस्कव्हर मोटारसायकल जप्त केली असुन उर्वरीत तपासकामी नमूद तीघांना पो.ठा. शिराढोण यांच्या स्वाधीन केले आहे.मनाई आदेश झुगारुन दुकाने चालू ठेवणाऱ्या दोघांवर पोलीसांतर्फे गुन्हे दाखल

उस्मानाबाद  कोविड- 19 संदर्भाने  जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष यांच्या आदेशाने जिल्ह्यात विविध मनाई आदेश अंमलात आहेत. त्या बंदी आदेशांचे उल्लंघन करुन मजहर अहमद पाशमियॉ, रा. ख्वॉजानगर, उस्मानाबाद यांनी दि. 08.09.2020 रोजी 19.30 वा. सु. उस्मानाबाद शहरातील एलआयसी कार्यालगत असलेले ‘सानिया ट्रेडर्स’ हे दुकान व्यवसायास चालू ठेवले. तर याच दिवशी पांडुरंग मोहन इंगळे, रा. येडशी, ता. उस्मानाबाद यांनी 19.30 वा. सु. येडशी येथील ‘आनंद स्वीटमार्ट' हे ’ दुकान व्यवसायास चालू ठेवले.

No comments