Header Ads

सुनेचा छळ, गुन्हा दाखलपोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): सविता बलवंत चव्हाण, रा. मधला तांडा, मौजे जहागीरदारवाडी, ता. उस्मानाबाद या दागिने व वाहनखरेदीसाठी माहेरहुन पैसे आनत नव्हत्या. याचा राग सासरकडील 1)बलवंत देवीचंद चव्हाण (पती) 2) सुवर्णा चव्हाण (सासु) 3) देवीचंद चव्हाण (सासरा) 4) सुहास चव्हाण (दिर), चौघे रा. अंबेजवळगा तांडा, ता. उस्मानाबाद 5) पुजा श्रीकांत राठोड, रा. जहागीरदारवाडी तांडा यांना होता. यावर त्यांनी संगणमताने सन- 2018 पासुन सविता यांचा सासरी- अंबेजवळगा येथे वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ केला. तसेच माहेरी- जहागीरदारीवाडी मधला तांडा येथे येउन पैसे व दागिने न आनल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सविता यांच्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 498 (अ), 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 05.09.2020 रोजी नोंदवला आहे.

 

  

चोरी


पोलीस ठाणे, तुळजापूर: धनराज देवराव माने, रा. वडगाव (लाख), ता. तुळजापूर यांनी दि. 04.09.2020 रोजी आपल्या राहत्या घरा समोर लावलेली हिरो स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 25 एआर 1783 ही मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. अशा मजकुराच्या धनराज माने यांनी दि. 06.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

  अपघात


पोलीस ठाणे, तुळजापूर: बब्रु सितोळे भोसले, वय 55 वर्षे, रा. वेताळनगर, तुळजापूर हे दि. 29.08.2020 रोजी 21.45 वा. सु. तुळजापूर घाटामध्ये तुळजापूर- सोलापूर रस्त्याने पायी चालत जात होते. यावेळी मो.सा. क्र. एम.एच. 25 एएन 2763 च्या अज्ञात चालकाने मो.सा. निष्काळजीपणे चालवून बब्रु भोसले यांना धडक दिली. या अपघातात बब्रु भोसले हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचारास न नेता, अपघाताची खबर पोलीसांना न देता संबंधीत मोटारसायकल चालक घटनास्थळावरून पसार झाला. अशा मजकुराच्या राजा बब्रु भोसले (मयताचा मुलगा) यांनी दि. 05.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ)(ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, मुरुम: ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एच 3309 च्या अज्ञात चालकाने दि. 31.08.2020 रोजी 22.00 वा. सु. मौजे भासगा शिवारात ट्रॅक्टर निष्काळजीपणे चालवून पायी चालत जाणाऱ्या शैलेश महादेव कागे, रा. भोसगा, ता.  लोहारा यांना पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या शैलेश कागे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा दि. 05.09.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments