Header Ads

उस्मानाबाद : अल्पवयीन मुलीची आत्महत्या

 उस्मानाबाद जिल्हा: एका खेडेगावातील एका 15 वर्षीय मुलीने (नाव- गाव गोपनिय) महिनाभरापुर्वी आत्महत्या केली होती. यावरुन संबंधीत पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली होती. सदर प्रकरणी आकस्मात मृत्युची चौकशी चालू असतांना आत्महत्या ग्रस्त मुलीच्या पित्याने लेखी निवेदन दिले की, शेजारील खेडेगावातील एका तरुणाच्या (नाव- गाव गोपनीय) त्रासास कंटाळून तीने आत्महत्या केली आहे. यावरुन संबंधीत पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 305, 354 सह पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दि. 23.09.2020 रोजी नोंदवला आहे.

 

 

  फसवणूक.

पोलीस ठाणे, नळदुर्ग: धनराज विठोबा सुरवसे, रा. मुर्टा, ता. तुळजापूर हे 10.09.2020 रोजी 17.00 वा. सु. नळदुर्ग येथील एसबीआय बँक शाखेच्या एटीएमच्या खोलीमध्ये पैसे काढत असतांना त्यांच्या नकळत कोणीतरी अज्ञात व्यक्तीने एटीएम कार्डची आदलाबदल करुन धनराज सुरवसे यांच्या एटीएम कार्डद्वारे वेगवेगळ्या एटीएम केंद्रामधुन दि. 10.09.2020 ते 12.09.2020 या कालावधीत त्यांच्या बँक खात्यामधील एकुण 1,81,220/-रु. रक्कम काढून घेउन त्यांची फसवणूक केली आहे. अशा मजकुराच्या धनराज सुरवसे यांनी दि. 23.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम- 66 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments