Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखलतामलवाडी: चिंतामण नारायण यादव, रा. माऊली नगर, कळंब यांच्या राहत्या घराचे बांधकाम अपूर्ण असल्याने घरास दरवाजे, खिडक्या बसवलेल्या नाहीत. याचा फायदा घेउन अज्ञात चोरट्याने दि. 08.09.2020 रोजी मध्यरात्री घरातील ओनीडा कंपनीचा टीव्ही, सॅमसंग मोबाईल फोन व भिंतीवरील घड्याळ असा एकुण 11,200/-रु. किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या चिंतामण यादव यांनी दि. 14.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 उमरगा: उमरगा तालुक्यातील मुळज गावात उभारल्या जात असणाऱ्या सौर उर्जा संयंत्र उभारले जात असुन कंत्राटदाराने त्याचे साहित्य तेथे उघड्यावर ठेवले आहे. या साहित्यातील एक खोके उघडून त्यातील प्रत्येकी 8,000/-रु. किंमत असलेल्या 12 सौर उर्जा पाट्या अज्ञाताने चोरुन नेल्या असल्याचे दि. 10.09.2020 रोजी 14.30 वा. कंत्राटदार प्रतिनीधी- श्री. शुभेंद्र श्रीवास्तव, रा. बिहार राज्य यांच्या निदर्शनास आले. यावरुन नमूद कंत्राटदार प्रतिनीधी यांनी दि. 15.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

  येरमाळा: नसीर वजीर पठाण, रा. तेरखेडा, ता. वाशी यांनी आपली हिरो होंडा मो.सा. क्र. एम.एच. 25 एआर 2330 ही दि. 10.09.2020 रोजी राहत्या घरा समोर लावलेली होती. ती पहाटे 05.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या नसीर पठाण यांनी दि. 15.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर: सोमनाथ प्रकाश कोरे, रा. व्होनाळा, ता. तुळजापूर यांनी दि. 10.09.2020 रोजी गावातीलच आपल्या चुलत भावाच्या घरासमोर लावलेली हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा. एम.एच. 13 एयु 2346 ही मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सोमनाथ कोरे यांनी दि. 15.09.02020 दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा नोंदवला आहे.

No comments