Header Ads

अवैध मद्य विरोधातील विशेष मोहिमे दरम्यान 21 छापेउस्मानाबाद जिल्हा: काल गुरुवार दि. 10.09.2020 रोजी मा. पोलीस अधीक्षक  राज तिलक रौशन यांच्या आदेशावरुन अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम करण्यात आली. या मोहिमेदरम्यान 21 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा 1,800 लि. द्रवपदार्थ जागीच ओतून नष्ट करण्यात आला तर 188 लि. गावठी दारु, देशी दारुच्या 224 बाटल्या, विदेशी दारुच्या 23 बाटल्या जप्त करण्यात आल्या. ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थ व जप्त दारु यांची एकत्रीत किंमत 40,044 ₹ आहे. यावरुन 21 व्यक्तींविरुध्द म.दा.का. अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 21 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पो.ठा. भुम: लता दादा काळे, रा. कल्याण नगर पारधी पिढी, भुम या कल्याण नगर पारधी पिढी येथील देवी मंदीरासमोर गावठी दारु निर्मीतीचा 1,800 लि. द्रवपदार्थ व गावठी दारु 20 लि. (साहित्यासह एकुण किं.अं. 11,400/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.

शहाजी श्रीपती इंगोले, रा. वालवड, ता. भुम हा गावातीलच ‘समर्थ हॉटेल’ च्या बाजूस 180 मि.ली. देशी दारुच्या 09 बाटल्या (किं.अं. 468/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना आढळला.

पो.ठा. तामलवाडी: यशवंत खेमा राठोड, रा. हिप्परगे (बक्षी), ता. सोलापूर (द.) हा तामलवाडी- पिंपळा जाणाऱ्या रस्त्याचे बाजूस 30 लि. गावठी दारु (किं.अं. 3,000/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना आढळला.

पो.ठा. मुरुम: दत्ता अशोक मिरजे, रा. आलुर, ता. उमरगा हा गावातील गणेश इंगळे यांच्या चिकनच्या दुकानाच्या बाजूस 05 लि. गावठी दारु (किं.अं. 520/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना आढळला.

तात्याराव शाम सरवदे, रा. मुरळी, ता. उमरगा हा गावपरिसरात 10 लि. गावठी दारु (किं.अं. 550/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना आढळला.

पो.ठा. लोहारा: गौतम तात्याराव भंडारे, रा. कास्ती (बु.), ता. लोहारा हा आपल्या राहत्या घराच्या बाजूस 180 मि.ली. च्या देशी दारुच्या 14 बाटल्या (किं.अं. 980/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना आढळला.

बाबुराव मानसिंग राठोड, रा. खेड, ता. लोहारा हा आपल्या राहत्या घरासमोर 180 मि.ली. देशी दारुच्या 12 बाटल्या (किं.अं. 960/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना आढळला.

पो.ठा. उस्मानाबाद (श.): चंदा विजय पवार, रा. पापनास नगर, उस्मानाबाद हा वडगांव (सि.) येथे 33 लि. गावठी दारु (साहित्यासह किं.अं. 2,180/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना आढळला.
अंजना चंदर पवार, रा. जुना बसडेपो पारधी पिढी, उस्मानाबाद या आपल्या राहत्या वस्तीत 35 लि. गावठी दारु (किं.अं. 3,310/-रु.) अवैधपणे बाळगल्या असतांना आढळल्या.


पो.ठा. कळंब: विनोद बळीराम घुले, रा. कल्पनानगर, कळंब हा कळंब येथील आपल्या ‘सनराईज हॉटेल’ मध्ये 180 मि.ली. विदेशी दारुच्या 11 बाटलया (किं.अं. 1,650/-रु.) विनापरवाना विक्रीसाठी बाळगला असतांना आढळला.

दिपक रामकिसन मडके, रा. मोहा, ता. कळंब हा मोहा- येडशी रस्त्यावरील ‘शिवनेरी हॉटेल’ येथे 180 मि.ली. विदेशी दारुच्या 10 बाटल्या (किं.अं. 1,400/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना आढळला.

पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.): सुनिल दत्तु दिंडोळे, रा. चिलवडी, ता. उस्मानाबाद हा आपल्या राहत्या घरासमोर 180 मि.ली. विदेशी दारुच्या 2 बाटल्या व 10 लि. गावठी दारु (एकुण किं.अं. 900/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना आढळला.

हिराबाई रावसाहेब काळे, रा. सकनेवाडी, ता. उस्मानाबाद या गावातच 10 लि. गावठी दारु (किं.अं. 610/-रु.) अवैधपणे बाळगल्या असतांना आढळल्या.

आण्णा शाहु मचाले, रा. भानसगाव, ता. उस्मानाबाद हा आपल्या राहत्या घरासमोर 15 लि. गावठी दारु (किं.अं. 900/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना आढळला.

पो.ठा. येरमाळा: रमेश बब्रुवान साळुंके, रा. येरमाळा, ता. कळंब हा गावातील साई फुटवेअर दुकानाच्या बाजुस 180 मि.ली. देशी दारुच्या 11 बाटल्या (किं.अं. 770/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना आढळला.
अनुसयाबाई देविदास तोरडमल, रा. कडकनाथवाडी, ता. वाशी या गावपरिसरात 10 लि. गावठी दारु (किं.अं. 650/-रु.) अवैधपणे बाळगल्या असतांना आढळल्या.

पो.ठा. परंडा: राजु सलीम सौदागर, रा. माणकेश्वर, ता. भुम हा गावातील तांबेवाडी रस्त्यालगत एका शेडजवळ 180 मि.ली. देशी दारुच्या 15 बाटल्या (किं.अं. 900/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना आढळला.
पो.ठा. आनंदनगर: जया नारायण वाघमारे, रा. शिंगोली, ता. उस्मानाबाद या गावातील एका पत्रा शेडमध्ये 10 लि. गावठी दारु (किं.अं. 420/-रु.) अवैधपणे बाळगल्या असतांना आढळल्या.

पो.ठा. बेंबळी: भारत वसंत शिंदे, रा. बामणी, ता. उस्मानाबाद हा बामणी- बामणीवाडी रस्यावरील पुलाजवळ 180 मि.ली. देशी दारुच्या 14 बाटल्या (किं.अं. 728/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना आढळला.

पो.ठा. तुळजापूर: अनिल विश्वासराव पाटील, रा. तिर्थ (बु.), ता. तुळजापूर हा गावातील विश्वकृपा ढाब्यासमोर 180 मि.ली. देशी दारुच्या 138 बाटल्या (किं.अं. 7,176/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना आढळला.

पो.ठा. नळदुर्ग: अर्जुन बाबुराव जाधव, रा. सलगरा (म.), ता. तुळजापूर हा गावातील बसस्थानक जवळील एका ढाब्याच्या बाजूस 180 मि.ली. देशी दारुच्या 11 बाटल्या (किं.अं. 572/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना आढळला.

No comments