Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल परंडा: 1) विशाल जाधव 2) अजय जाधव, दोघे रा. परंडा 3)गणेश सुभाष जाधव, रा. मिरजगांव, ता. कर्जत या तीघांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 14.09.2020 रोजी 13.30 वा. सु. परंडा येथील नातेवाईक- धनेश हरी जाधव यांना बावची चौक, परंडा येथे शिवीगाळ करुन कोयता, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यात धनेश यांनी कोयत्याचा वार हातावर झेलल्याने दोन्ही हातांस गंभीर जखम झाली. अशा मजकुराच्या धनेश जाधव यांनी दि. 14.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 नळदुर्ग: कोंडीबा श्रीपती देवकर, वय 80 वर्षे, रा. कार्ला, ता. तुळजापूर हे पत्नी- सुशीला व नातेवाईक- मालनबाई यांसह दि. 13.09.2020 रोजी 15.00 वा. सु. आपल्या शेतात होते. यावेळी त्यांचा मुलगा- सोनबा, नातु- उध्दव व यादव यांसह गावातील- खंडु ढोबळे आणि मंगेश व महेश देवकर या 6 जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून शेतीसंबंधीत वादावरुन कोंडीबा यासह सुशीला व मालनबाई यांना शिवीगाळ करुन काठी, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या कोंडीबा देवकर यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 326, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दि. 15.09.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments