Header Ads

उस्मानाबाद : सुनेचा छळ, गुन्हा दाखल


उस्मानाबाद - दिव्या जगदीश नाईक, रा. समता नगर, उस्मानाबाद यांनी वाहन खरेदीसाठी माहेरहुन पैसे आणावेत असा तगादा सासरकडील 1)जगदीश रंगनाथ नाईक (पती) 2) जनाबाई (सासु) 3) रोहिणी दिपक कुलकर्णी (नणंद), तीघे रा. हैद्राबाद 4) प्रणिता रविंद्र सराज (नणंद), रा. उस्मानाबाद यांनी लावला होता. त्यासाठी त्यांनी संगणमताने दिव्या यांचा लग्नानंतर उस्मानाबाद येथे वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ केला. तसेच दिव्या यांना माहेराहुन स्त्रीधन मिळालेले दागिने त्यांनी काढून घेतले. अशा मजकुराच्या दिव्या यांच्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 498 (अ), 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 24.09.2020 रोजी नोंदवला आहे.

मारहाण.

येरमाळा: चंद्रकांत आप्पाराव घोळवे, रा. उपळाई, ता. कळंब हे पत्नीसह दि. 23.09.2020 रोजी 17.00 वा. सु. आपल्या शेतात काम करत होते. यावेळी शेजारील शेतकरी अण्णासाहेब गोरख मुंडे यांसह त्यांचे गावातीलच नातलग- गोरख मुंडे, चंद्रकांत मुंडे, मनोहर मुंडे यांनी यांनी तेथे येउन चंद्रकांत घोळवे यांसह त्यांच्या पत्नीस शेतजमीनीच्या सीमेवरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या चंद्रकांत घोळवे यांनी दि. 24.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                    


No comments