Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल ढोकी: निखील ज्ञानेश्वर मते, रा. दहीफळ, ता. कळंब हे दि. 16.09.2020 रोजी 17.30 वा. सु. ढोकी बसस्थानक येथे बसमध्ये चढत असतांना त्यांच्या विजारीच्या खिशातील विवो एसवन मोबाईल फोन (किं.अं. 10,000/-रु.) गर्दीचा फायदा घेउन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरला आहे. अशा मजकुराच्या निखील मते यांनी दि. 17.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 तुळजापूर: शिवराज रामचंद्र जाधव, रा. ढेकरी, ता. तुळजापूर यांचे गावातील बसथांब्याजवळ ‘शिवराज कृषी सेवा केंद्र’ आहे. त्या दुकानाचा व शेजारील अन्य दुकानांचे पत्रे अज्ञात चोरट्याने दि. 17.09.2020 रोजी मध्यरात्री कापून दुकानांच्या गल्ल्यातील एकुण 10,100/-रु. व एक रिकामे एलपीजी सिलेंडर चोरुन नेले आहे. अशा मजकुराच्या शिवराज जाधव यांनी दि. 18.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments