Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल 
पोलीस ठाणे, उमरगा: अमर जगन्नाथ लोहार, रा. महादेव गल्ली, उमरगा यांनी तानाजी विठ्ठलाप्पा जाधवा, रा. तुरोरी, ता. उमरगा यांच्या रोपवाटीकेत 16 टिप्पर मुरुम टाकला होता. या कामाचे काही पैसे तानाजी जाधवा यांनी अमर लोहार यांना दिले होते. उर्वरीत राहीलेले पैसे अमर लोहारा यांनी मागणी केले असता तानाजी जाधव यांनी त्यांना शिवीगाळ केली. दि. 09.09.2020 रोजी 14.30 वा. सु. अमर लोहार हे उमरगा येथील रत्नदीप अर्थमुव्हर्स कार्यालया समोर थांबले होते. यावेळी तानाजी जाधवा यांनी तेथे येउन रत्नदीप अर्थमूव्हर्स चे मालक- रतन माळी यांच्या इनोव्हा कारची काच लोखंडी हातोड्याने फोडून कारचे नुकसान केले. तसेच अमर लोहारा यांची गचांडी धरुन त्यांच्या खीशातील 15,000/-रु. काढून घेउन गेला. अशा मजकुराच्या अमर लोहार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 327, 427, 323, 504 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, कळंब: आपल्या मुलांस धक्काबुक्की केल्याचा जाब संतोष दिलीप पिंगळे, रा. पाथर्डी, ता. कळंब यांनी दि. 08.09.2020 रोजी गावातील किराणा दुकानासमोर भाऊबंद- भास्कर गोविंद पिंगळे यांना विचारला. यावर चिडुन जाउन भास्कर पिंगळे यांनी मुलगा- शुभम याच्या सहकार्याने संतोष पिंगळे यांना दगडाने मारहाण करुन जखमी केले. वडीलांस वाचवण्यास आलेल्या सुमित व सुजित यांनाही नमूद दोघांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन धमकावले. अशा मजकुराच्या संतोष पिंगळे यांनी दि. 09.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, मुरुम: संजुबाबा व राजेंद्र लक्ष्मण सातपुते, रा. दाळींब, ता. उमरगा या दोघा भावांत वडीलोपार्जीत शेती- संपत्ती वाटपावरुन वाद आहे. यातूनच चिडून जाउन दि. 09.09.2020 रोजी राजेंद्र यांसह त्यांच्या कुटूंबीयांनी संजुबाबा सातपुते यांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी व फरशीने मारहाण केली. यात संजुबाबा यांच्या डोक्यास जखम झाली. अशा मजकुराच्या संजुबाबा सातपुते यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments