Header Ads

तुळजापूर : मोबाईल फोन दुकान फोडीतील मालासह 2 आरोपी ताब्यात


तुळजापूर  - तुळजापूर शहरातील लातुर रोड परिसरात असणाऱ्या ‘सिध्दी मोबाईल शॉप’ च्या छताचा पत्रा दि. 07 व 08.08.2020 दरम्यानच्या रात्री अज्ञात चोरट्याने उचकटून आतील मोबाईल फोन- 16 नग, ब्ल्युटूथ हेडफोन- 5 नग, पॉवर बँक- 4 नग तसेच दुरुस्तीस आलेले 2 मोबाईल फोन चोरुन नेले होते. यावरुन पो.ठा. तुळजापूर येथे भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गु.र.क्र. 329/ 2020 दाखल आहे.

 या गुन्ह्याची कार्यपद्धती लक्षात घेउन पोलीसांनी शोध मोहिम चालू केली. यात आरोपी- 1) सम्राट मोहन कांबळे उर्फ अभिजीत, वय 19 वर्षे, 2) प्रविण अंबादास गोलकर, वय 19 वर्षे, दोघे रा. हडको वसाहत, तुळजापूर यांना दि. 19.09.2020 रोजी तुळजापूर शहरातून ताब्यात घेतले. तपासादरम्यान चोरीस गेलेला नमूद माल त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आला असुन उर्वरीत तपासकामी त्यांना पो.ठा. तुळजापूर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दोघा आरोपींनी अशा स्वरुपाचा गुन्हा अन्यत्र केला आहे काय? याचा तपास केला जाणार आहे.

3 वर्षांपासुन पाहिजे असलेली महिला आरोपी अटकेत

 पो.ठा. येरमाळा गु.र.क्र. 160 / 2017 या मारहाणीच्या गुन्ह्यातील महिला आरोपी- मनिषा शिंदे उर्फ रुक्मिनी, वय 22 वर्षे, रा. पारधी पिढी, खामकरवाडी, ता. वाशी हि गेल्या 3 वर्षांपासुन पोलीसांना हवी होती. तीला स्था.गु.शा. च्या पथकाने खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आज दि. 20.09.2020 रोजी खामकरवाडी येथून ताब्यात घेतले असुन उर्वरीत कार्यवाहीस्तव पो.ठा. येरमाळाच्या ताब्यात दिले आहे.


No comments