Header Ads

परंडा नगरपरिषदेत अपहार, दोघांविरुद्ध गुन्हा

परंडा: लोकसेवक- 1) महेश रतन कसबे 2) बादेश इब्राहीम मुजावर, दोघे रा. परंडा यांनी दि. 06.08.2020 रोजी पर्यंत संगणमताने बनावट दस्तऐवज बनवून शासनाने गव्हर्नमेंट ऑफीस ॲन्ड स्टाफ क्वार्टरसाठी आरक्षीत केलेली परंडा नगरपरिषद हद्दीतील सर्वे क्र. 234 ‘ब’ मधील 10 आर जमीन खुली जागा असल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करुन शासनाची फसवणुक केली. यावरुन नगरपरिषद लिपीक- रणजित काशीद यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 465, 466, 471, 34 अन्वये गुन्हा दि. 04.09.2020 रोजी नोंदवला आहे.

 करजखेडामध्ये चोरी 

बेंबळी: शिवाजी शंकर भोसले, रा. करजखेडा, ता. उस्मानाबाद यांच्या राहत्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात चोरट्याने दि. 04.09.2020 रोजी मध्यरात्री तोडून घरातील 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 2,000/-रु. चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या शिवाजी भोसले यांनी दि. 04.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments