Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल
शिराढोण: अनिल कडाप्पा गायकवाड, रा. मंगरुळ, ता. कळंब (ह.मु. द्वारकानगरी, कळंब) यांच्या जनावरांनी भाऊबंद- सिध्देश्वर गायकवाड यांच्या शेतातील सोयाबीनचे पिक खाल्ले. या कारणावरुन सिध्देश्वर गायकवाड व बेबी गायकवाड अशा दोघांनी दि. 11.09.2020 रोजी 11.00 वा. सु. रोजी कळंब गोशाळा येथे अनिल गायकवाड यांना शिवीगाळ करुन कुऱ्हाड डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अनिल गायकवाड यांनी दि. 12.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.तुळजापूर: तुळजापूर तालुक्यातील ढेकरी येथील देविदास हरीदास जाधव व आगतराव महादु पठाडे यांच्यात शेत रस्ता दुरुस्तीचा खर्च व वापराच्या कारणावरुन वाद आहे. या दोन्ही गटात दि. 10.09.2020 रोजी 18.30 वा. सु. शेतामध्ये पुन्हा वाद उफाळून आला. यात आगतराव पठाडे, आकाश, पांडुरंग, शोभा, अन्य 4 व्यक्ती यांचा गट व जाधव कुटूंबातील देवीदास जाधव, कालीदास, कैलास, विकास, मनोज, महेश, अविनाश व अन्य व्यक्ती यांचा गट यांनी परस्परविरोधी गटांतील सदस्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कत्ती, चाकु, काठीने मारहाण करुन जखमी केले.

       अशा मजकुराच्या दोन्ही गटांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या परस्परविरोधी 2 प्रथम खबरेवरुन दि. 12.09.2020 रोजी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

No comments