Header Ads

भूम : सांडपाणी सोडण्याच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी

 
भुम: सोनगिरी, ता. भुम येथील कुटे कुटूंबातील- किसन प्रभु कुटे, दाळुबाई, रविंद्र, ऋषीकेश, बाबासाहेब, उत्रेश्वर, शांताबाई, नानासाहेब यांच्या गटाचा गावातीलच रुपनर कुटूंबातील- बाबा लक्ष्मण रुपनर, प्रयगाबाई, रामहरी, रोहीदास, रुक्मीणबाई, सुरेखा यांच्या गटाशी दि. 27.09.2020 रोजी सकाळी 07.30 वा. सु. सोनगिरी शिवारात सांडपाणी सोडण्याच्या कारणावरुन वाद झाला. यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटांती सदस्यांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील सदस्यांनी दि. 28.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.


अपघात

 उमरगा: नागेश मल्लिकार्जुन किरुनगे व हनुमंत मनोहर बोके, दोघे रा. त्रिपुरांत, ता. बसवकल्याण हे दोघे दि. 16.09.2020 रोजी 16.00 वा. सु. तलमोड, ता. उमरगा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरुन मो.सा. क्र. के.ए. 56 एएच 0703 ने प्रवास करत होते. दरम्यान तलमोड गावाजवळ रस्ता वळणावर हनुमंत बोके यांनी नमूद मो.सा. निष्काळजीपणे चालवल्याने ती रस्त्यातील खड्ड्यात आदळली. यात मो.सा. वर पाठीमागे बसलेले नागेश किरुनगे यांच्या डोक्यातस गंभीर दुखापत झाली. अशा मजकुराच्या विरभंड किरुनगे यांनी दि. 27.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 आणि मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments