Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल


तामलवाडी: भिमराव डोलारे, रा. गवळेवाडी, ता. तुळजापूर यांच्या राहत्या घरासमोरील रत्यावर दि. 20.09.2020 रोजी 09.00 वा. सु. भाऊबंद- सागर विठ्ठल डोलारे यांनी ॲपे मॅजीक वाहन उभे करुन मोठ्या आवाजात गीत-संगीत चालू ठेवले होते. यावर भिमराव डोलारे यांनी सागर यास आवाज कमी करण्यास सांगीतला. यावर चिडून जाउन सागर डोलारे व बालाजी डोलारे या दोघा भावांनी भिमराव डोलारे यांसह त्यांचा मुलगा- राजेंद्र यांस शिवीगाळ करुन कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या राजेंद्र डोलारे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 उमरगा: विद्याधर माधवराव बिराजदार, रा. गुगळगांव, ता. उमरगा हे दि. 18.09.2020 रोजी 15.00 वा. सु. आपल्या शेतात जनावरे चारत असतांना शेजारील शेतकरी- संदीप बिराजदार यांच्या शेतातील पिक विद्याधर यांच्या जनावरांनी खाल्ले. यावर संदीप बिराजदार यांनी चिडुन जाउन विद्याधर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या विद्याधर बिराजदार यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504 अन्वये गुन्हा दि. 20.09.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments