Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखलउस्मानाबाद  - आशिष बबन साळुंके, रा. कोट गल्ली, उस्मानाबाद याने व्यक्तीगत उधाऱ्या देण्यासाठी दि. 12.09.2020 रोजी 10.00 वा. सु. राहत्या घरातून स्वत:च्या आईचे 7 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले. यावरुन त्याची आई- मंगल बबन साळुंके यांनी दि. 12.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 नळदुर्ग: बालाजी रावसाहेब देवकर, रा. कार्ला, ता. तुळजापूर यांच्या कार्ला येथील शेतातील चंदनाचे झाड अज्ञात चोरट्याने दि. 12.09.2020 रोजी 09.00 वा. सु. कापून चोरुन नेले. अशा मजकुराच्या बालाजी देवकर यांनी दि. 13.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


तुळजापूर: सुमित बळीराम मुसळे, रा. नगारवाडी, ता. लोहा हे मोटारसायकलने दि. 12.09.2020 रोजी रात्री 01.45 वा. सु. तुळजापूर- लातुर असा प्रवास मोटारसायकलने करत होते. यावेळी तुळजापूर बायपास रस्यावर 2 अनोळखी व्यक्तींनी त्यांची मोटारसायकल सुमित मुसळे यांच्या मो.सा. समोर आडवी लाउन सुमित मुसळे यांना शिवीगाळ, दमदाटी करुन त्यांच्याजवळील रोख रक्कम 5,230/-रु., विवो मोबाईल फोन व खरेदी केलेले तीन टी-शर्ट जबरीने घेउन गेले. अशा मजकुराच्या सुमित मुसळे यांनी दि. 12.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments