उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन मयतउस्मानाबाद : श्रीमती जयश्री राजेंद्र कांबळे, रा. आशिव, ता. औसा यांचा दि. 19.09.2020 रोजी सारोळा रस्त्यावरील जगदंबा ढाब्यासमोर रस्ता अपघातात मृत्यु झाला होता. त्या संबंधी सुरु असलेल्या अकस्मात मृत्यु क्र. 53 / 2020 च्या चौकशीत मयताचा पती- राजेंद्र लालु कांबळे यांनी लेखी निवेदन दिले की, “ विशाल रामानंद उबाळे, रा. भादा, ता. औसा हा माझी पत्नी जयश्री हीला घेउन मो.सा. क्र. एम.एच. 24 बीएफ 3221 ने माझ्या मेहुनीच्या घरी जात होता. प्रवासा दरम्यान विशाल याने निष्काळजीपणे मो.सा. चालवल्याने खड्ड्यात आदळून घसरली. या अपघातात माझी पत्नी जयश्री हीच्या डोक्यास गंभीर दुखापत होउन ती उपचारादरम्‍यान मयत झाली असुन तीच्या मृत्युस विशाल उबाळे हा जबाबदार आहे.” यावरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 337, 338 अन्वये गुन्हा दि. 26.09.2020 रोजी नोंदवला आहे.


वाशी: प्रकाश सुंदरराव सोन्ने, वय 28 वर्षे, रा. सोन्नेवाडी, ता. भुम हा दि. 22.08.2020 रोजी 18.00 वा. सु. राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरुन मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्यु 6577 ने जात होते. दरम्यान सोन्नेवाडी शिवारातील हॉटेल जयहिंदच्यासमोर आले असता लाखनगाव, ता. वाशी येथील जयदत्त ज्ञानोबा ढेपे याने मो.सा. क्र. एम.एच. 24 टी 4214 ही चुकीच्या दिशेने चालवून प्रकाश सोन्ने यांच्या मो.सा. ला समोरुन धडक दिली. या अपघातात प्रकाश सोन्ने हे गंभीर जखमी होउन उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या अक्षय सोन्ने यांनी दि. 27.09.2020 रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments