Header Ads

रोहितराज दंडनाईक यांना लाथाबुक्क्यांनी मारहाणबेंबळी: कारखाना लिलावात घेऊ नका, असे सांगितल्यामुळे दोघांनी विजय दंडनाईक यांचे चिरंजीव रोहीतराज दंडनाईक यांना  लाथाबुक्क्यांची मारहाण केली.

रोहितराज विजय दंडनाईक, रा. यशवंतनगर,  उस्मानाबाद हे शिला - अतुल शुगरटेक कारखान्याचे मालक आहेत. नमूद कारखाना बँकेने लिलावात  काढल्याने शालीवान सिद्राम माने व बब्रुवान माने, दोघे रा. सोलापूर हे तो कारखाना घेणार  असल्याने रोहितराज दंडनाईक यांनी “कारखाना लिलावात  घेऊ नका” अशी विनंती त्या दोघांना केली.

यावर दि. 03.09.2020 रोजी 11.30 वा. सु. मौजे समुद्रवाणी- कोंड रस्त्यावर शालीवान माने व बब्रुवान माने यांनी रोहीतराज यांची कार अडवून त्यांची गच्ची धरुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या रोहितराज दंडनाईक यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 323, 504, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments