Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल
लोहारा: सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी, रा. राम मंदीरजवळ, लोहारा यांच्या लोहारा- जेवळी रस्त्यावरील ‘सचिन कलेक्शन’ सह शेजारील रॉयल बिअर शॉपी, जगदंबा ट्रेडर्स, जगदंबा कृषी सेवा केंद्र व राजेश्वरी स्टिल मटेरियल या दुकानांचे शटर अज्ञात चोरट्याने दि. 07.09.2020 रोजी मध्यरात्री उचकटुन आतील रोख रक्कम 51,760/-रु. व 5000/- रु. किंमतीचे कपडे चोरुन नेले. अशा मजकुराच्या सचिन कुलकर्णी यांनी दि. 08.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


, शिराढोण: गोविंदपुर, ता. कळंब येथील अजय महादेव जाधव यांच्या ट्रॅक्टरची एक्साईड कंपनीची 12 व्होल्ट बॅटरी, मोटो जी-5 एएस मोबाईल फोन आवेश खाजा शेख व जुबेर शेख, दोघे रा. केज, जि. बीड यांनी दि. 08.09.2020 रोजी 03.00 वा. सु. चोरी केला. तसेच स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्यु 5199 व विवो कंपनीचे दोन मोबाईल फोन चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या अजय जाधव यांनी दि. 08.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 511 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 भुम: शिवलींग बसलिंग खराडे, रा. आरसोली, ता. भुम यांच्या गावातील किराणा दुकानाचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 08.09.2020 रोजी मध्यरात्री तोडून दुकानातील एलटीएलके कंपनीचे स्टार्टर, किराणा साहित्य (साबन- 50 नग, पॅराशुट तेल बॉटल- 50 नग, विद्युत बोर्ड- 5 नग, बिस्कीट- 50 नग) व रोख रक्कम 2,800/-रु. असा एकुण 12,900/-रु. चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या शिवलींग खराडे यांनी दि. 09.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 बेंबळी: महेश बाबुसिंग वायस, रा. ताकविकी, ता. उस्मानाबाद यांनी दि. 05.09.2020 रोजी आपल्या राहत्या घरासमोर लावलेली होंडा शाईन मो.सा. क्र. एम.एच. 04 जेटी 3830 ही मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. अशा मजकुराच्या महेश वायस यांनी दि. 09.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments