Header Ads

बेंबळी : आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
 बेंबळी: तुकाराम नरसिंग सुर्यवंशी, वय 60 वर्षे, रा. गोगाव, ता. उस्मानाबाद यांनी दि. 19.08.2020 रोजी 17.00 वा. सु. आपल्या राहत्या घरी पत्र्याच्या छतास दोरी बांधुन गळफास घेउन आत्महत्या केली होती. गावातीलच- शिवाजी चंद्रकांत कचरे व दिपक मारुती रोकडे- सुर्यवंशी हे तुकाराम सर्यवंशी यांना वारंवार विनाकारण शिवीगाळ करुन अपमानास्पद बोलत होते. त्यांच्या या मानसिक त्रासास कंटाळून तुकाराम यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या अविनाश तुकाराम सुर्यवंशी (मयताचा मुलगा) यांनी आकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सी.आर.पी.सी. कलम- 174 च्या चौकशीत दिलेल्या निवेदनावरुन नमूद 2 व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 306, 34 अन्वये गुन्हा दि. 08.09.2020 रोजी नोंदवला आहे.
No comments