उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल शिराढोण: दत्तात्रय जनार्दन लोभे व बालाजी पांडुरंग लोभे, दोघे रा. कानेगाव, ता. लोहारा या दोघा भावांत शेतजमीन वाटणीच्या कारणावरुन वाद आहे. यात दत्तात्रय लोभे यांनी बालाजी यांच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला असुन त्याचा राग मनात धरुन बालाजी लाभे यांसह त्यांची पत्नी- सुरेखा लोभे या दोघांनी दि. 19.09.2020 रोजी 09.00 वा. सु. गावातील कदम यांच्या किरणा दुकानासमोर दत्तात्रय लोभे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दत्तात्रय लोभे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 बेंबळी: दत्तात्रय सुग्रीव माने व महादेव लक्ष्मण माने, दोघे रा. अनसुर्डा, ता. उस्मानाबाद या दोघांच्या शेतात सामाईक बांध आहे. महादेव यांच्या शेतातील पावसाचे पाणी दत्तात्रय यांच्या शेतात येत असल्याने दत्तात्रय यांनी ते पाणी आडवले. त्याचा राग मनात धरुन महादेव माने व त्यांचा मुलगा- हनुमंत या दोघा पिता-पुत्रांनी दि. 19.09.2020 रोजी 17.30 वा. सु. दत्तात्रय माने यांना अनसुर्डा शेतशिवारात शिवीगाळ करुन कुऱ्हाडीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या दत्तात्रय माने यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


                                                                                    

No comments