Header Ads

चोरीची मोटारसायकल जप्त, आरोपी अटकेतस्थानिक गुन्हे शाखा: तुळजापूर तालुक्यातील डिकमल पारधी वस्ती येथे राहणारा चिवचिव्या जयराम भोसले उर्फ सागर, वय 21 वर्षे हा चोरीची मोटारसायकल वापरत आहे. अशी गोपनीय खबर स्था.गु.शा. च्या सपोनि- आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, तानाजी माळी, भागवत झोंबाडे, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे यांच्या पथकास मिळाली होती. यावर पथकाने दि. 05.09.2020 रोजी डिकमल पारधी वस्ती येथुन नमूद आरोपीस ताब्यात घेउन त्या हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल बाबत खात्री केली असता ती वाशी पो.ठा. हद्दीतून चोरीस गेलेली असुन त्या संबंधाने गु.र.क्र. 208 / 2020 नोंदलेला असल्याचे समजले. यावर पथकाने ती मो.सा. जप्त करुन आरोपीस वाशी पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.


 

 


 

जुगार विरोधी कारवाई


पोलीस ठाणे, उमरगा: जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन उमरगा पो.ठा. च्या पोलीसांनी काल दि. 05.09.2020 रोजी उमरगा शहरात मौजे कुन्हाळी येथे छापे मारले. यात उमरगा शहरातील पतंगे रोड येथे लियाकत गुलाबसाब औटी, रा. गुंजोटी, ता. उमरगा हा कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 750/-रु. बाळगलेला आढळला. तर दुसऱ्या घटनेत मौजे कुन्हाळी येथे संतोष माणिक वाघमोडे, रा. कुन्हाळी हा कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 540/-रु. बाळगला असतांना पथकास आढळला.

यावरुन नमूद 2 व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

 


अवैध मद्य विरोधी कारवाई


स्थानिक गुन्हे शाखा: किसन मनोहर सिध्दगणेश, रा. सिंदफळ, ता. तुळजापूर हा दि. 05.09.2020 रोजी गावातील अनिल भोसले यांच्या दुकानासमोर देशी दारुच्या 28 बाटल्या (किं.अं. 2,240/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना पो.ठा. स्था.गु.शा. यांच्या पथकास आढळला. यावरुन किसन सिध्दगेणेश याच्याविरुध्द पो.ठा. तुळजापूर येथे म.दा.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.   

No comments