Header Ads

उमरगा : दोन अपघातात तीन मयत, एक जखमी


उमरगा: चालक- दत्ता आबाचने याने मिनी ट्रक क्र. एम.एच. 13 सी.यु. 2464 हा दि. 21.09.2020 रोजी उमरगा- लातुर रस्त्यावरील माळज फाटा येथे निष्काळजीपणे चालवून समोरुन येत असलेल्या मो.सा. क्र. एम.एच. 24 एच 9904 व मो.सा. क्र. एम.एच. 25 के 7266 या दोन मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात एम.एच. 25 के 7266 वरील- 1)शरद निवृत्ती सुर्यवंशी, वय 35 वर्षे, 2)शंभु बाबुराव कुलकर्णी, वय 34 वर्षे, दोघे रा. बाबळसुर, ता. उमरगा हे दोघे गंभीर जखमी होउन मयत झाले तर एम.एच. 24 एच 9904 चा चालक किरकोळ जखमी झाला. अशा मजकुराच्या विवेकानंद माधवराव साळुंखे, रा. बलदवा नगर, लातुर यांनी दि. 24.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 उमरगा: चालक- समद अलिसाब अत्तार, रा. मंठाका, ता. बसवकल्याण याने ट्रक निष्काळजीपणे अचानक चालवल्याने ट्रकमध्ये चढत असणारे सहायक-विराण्णा विठ्ठल जवळगे, वय 31 वर्षे हा खाली पडून त्यांच्या अंगावरुन ट्रकचे चाक गेल्याने ते जागीच मयत झाले. ही घटना दि. 24.09.2020 रोजी 06.00 वा. सु. बायपास रोड, उमरगा येथे घडली. अशा मजकुराच्या संतोष विठ्ठल जवळगे (मयताचा भाऊ) यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 

No comments