Header Ads

ढोकी: धावत्या मिनी ट्रक मधून दीड लाखाचा माल चोरीस


 ढोकी: शंकर सुखदेव गायकवाड, रा. जागजी, ता. उस्मानाबाद हे दि. 25.09.2020 रोजी मिनी ट्रक क्र. एम.एच. 25 एजे 2074 ने माल वाहुन नेत होते. प्रवासादरम्यान दुधगाव शिवारात आले असता त्यांच्या लक्षात आले की, मिनी ट्रकच्या मागील बाजूचे टारपोलीन फाडून गाडीतील कापड गठ्ठे- 3 नग, औषध खोकी- 2 नग, फेविकॉलची खोकी- 13 नग असा एकुण 1,56,000/-रु. चा माल धावत्या वाहनातुन चोरीस गेला आहे. अशा मजकुराच्या शंकर गायकवाड यांनी दिलेल्या प्रथम खवरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा दि. 26.09.2020 रोजी नोंदवला आहे.No comments