Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखलतामलवाडी: प्रभाकर कुलकर्णी यांच्या सांगवी (काटी) शेत गट क्र. 35 मधील विहीरीवरील लाडा लक्ष्मी कंपनी- 5 अश्वशक्ती क्षमतेचा पानबुडी विद्युत पंप दि. 31.08.2020 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेला. अशा मजकुराच्या भाऊ- भालचंद्र कुलकर्णी यांनी दि. 02.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 तामलवाडी: सादीक अंबीर कुरेशी, रा. काटी, ता. तुळजापूर यांनी दि. 31.08.2020 रोजी आपल्या राहत्या घरासमोर लावलेली हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्यु 4779 ही मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सादीक कुरेशी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा दि. 02.09.2020 रोजी नोंदवला आहे.


उमरगा: उमरगा शहरातील तालुका लघु पशु सर्वचिकीत्सालयाच्या आवारातील जुनी लोखंडी तिजोरी दि. 31.08.2020 रोजी 11.00 वा. सु. अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. अशा मजकुराच्या पशुधन विकास अधिकारी- डॉ. सुलेमान सय्यद यांनी दि. 02.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 ढोकी: शशीकांत संदीपान ईरकर, रा. दाउतपूर, ता. उस्मानाबाद यांच्या दाउतपूर येथील शेतातील शेडचा पत्रा अज्ञात चोरट्याने दि. 01.09.2020 रोजी मध्यरात्री उचकटून आतील 3 शेळ्या चोरुन नेल्या आहेत. अशा मजकुराच्या शशीकांत ईरकर यांनी दि. 02.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 ढोकी: महादेव सुरेश काटे, रा. जागजी, ता. उस्मानाबाद यांनी अपल्या घरा समोर लावलेली क्लासिक बुलेट मो.सा. क्र. एम.एच. 25 एई 8812 ही दि. 03.09.2020 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या महादेव काटे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments