Header Ads

पोलीसांच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्या मंडळ सदस्यावर गुन्हा दाखल
पोलीस ठाणे, तुळजापूर: शिराढोण, ता. तुळजापूर गावातील ‘मोरया गणेश मंडळ’ सदस्यांनी विसर्जनादरम्यान मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याने त्या मंडळ सदस्यांवर दि. 01.09.2020 रोजी तुळजापूर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवण्याची कारवाई सुरु होती. यावेळी शिराढोण येथील सचिन सुरेश भिसे याने तुळजापूर पो.ठा. च्या आवारात येउन पोहेकॉ- जयप्रकाश प्रभाकर गलांडे यांना आमच्या मंडळावर तुम्ही कशी कारवाई करता. असे धमकावून, शिवीगाळ करुन त्यांची गचांडी धरुन त्यांच्याशी हुज्जत घातली. अशा प्रकारे सचिन भिसे याने पोलीसांच्या कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन पोहेकॉ- जयप्रकाश गलांडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


लाईनमनच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल

पोलीस ठाणे, लोहारा: मौजे जेवळी (द.) विज वितरण केंद्राचे लाईनमन- राजेंद्र बचाटे हे दि. 31.08.2020 रोजी 17.15 वा. सु. जेवळी (द.) गावातील महादेव मंदीराजवळील विज वितरण पेटीचे फ्युज- वायर बदलत होते. यावेळी गावातील- राजु उपासे याने तेथे येउन विज वितरण पेटीच्या दुरुस्तीच्या कारणावरुन राजेंद्र बचाटे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अशा प्रकारे त्याने लोकसेवकाच्या कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन लाईनमन- बचाटे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

विसर्जनादरम्यान मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळ सदस्यांवर गुन्हा दाखल

पोलीस ठाणे, तुळजापूर: शिराढोण, ता. तुळजापूर गावातील ‘मोरया गणेश मंडळ’ सदस्यांनी दि. 01.09.2020 रोजी विसर्जनादरम्यान मास्क लावने, सोशल डिस्टंन्सींग या मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याने मंडळ सदस्य- 1)रोहित वाघ 2)अमर भिसे 3)धिरज भिसे 4)रणजीत घुगे 5)माऊली भिसे 6)समाधान घुगे 7)बालाजी घोगरे 8)सोपान माने यांच्याविरुध्द सपोनि- सुशिल चव्हाण यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269, 271 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.No comments