Header Ads

उस्मानाबाद : सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान- विद्रुपिकरण करणाऱ्यांवर 2 गुन्हे दाखल


उस्मानाबाद : शेकापूर साठवण तलावाच्या पश्चिम बाजूच्या सांडव्याचे 5 मीटर बांधकाम दि. 19.09.2020 ते 20.09.2020 या दोन दिसाच्या कालावधीत कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ब्लास्टींगच्या सहाय्याने फोडून शासकीय मालमत्तेचे अंदाजे 25,000/-रु. चे नुकसान केले आहे. अशा मजकुराच्या पाटोदा- रुईभर पाटबंधारे विभागचे शाखाधिकारी- स्वामीराव चंदनशिवे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंधक अधिनियम कलम- 4 अन्वये गुन्हा दि. 24.09.2020 रोजी नोंदवला आहे.


उस्मानाबाद -  सिंधुबाई घुगे, रा. शिवनेरी नगर, उस्मानाबाद व त्यांचे पती अशा दोघांनी संगणमताने दि. 20.09.2020 रोजी 10.15 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोरील रस्त्यावरुन लोकांनी रहदारी करु नये या उद्देशाने सार्वजनिक रस्ता खोदुन येणाऱ्या- जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण केला. अशाप्रकारे त्या दोघां पती- पत्नींनी रस्ता खोदुन नगरपालीकेचे अंदाजे 10,000/-रु. चे आर्थिक नुकसान केले. यावरुन स्वच्छता निरिक्षक- सुनिल कांबळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 427, 34 आणि सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा अंतर्गत गुन्हा दि. 23.09.2020 रोजी नोंदवला आहे.


 

No comments