Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल


नळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास  अज्ञात चोरट्याने त्यांच्या उशास असलेला विवो एस-1 प्रो मोबाईल फोन व रोख रक्कम 4,500/-रु. असा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या वैजीनाथ कांबळे यांनी दि. 22.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 उमरगा: अनिकेत बालाजी जाधव, रा. डिग्गी रोड, उमरगा यांनी दि. 19.09.2020 रोजी 13.00 वा. आपल्या घरासमोर स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 12 एलजी 6942 ही ठेवली होती. ती मो.सा. 16.00 वा. लावल्या जागी न आढळल्याने ती चोरीस गेल्याचे समजले. अशा मजकुराच्या अनिकेत जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


  तुळजापूर: गंगाधर दशरथ कुंभार, रा. कामठा, ता. तुळजापूर यांच्या अपसिंगा शिवारात विहीर आहे. या विहीरीवर जलसिंचनास असलेला टाटा कॉमेट कंपनीचा डिझेल पंप हा अज्ञात चोरट्याने दि. 21 व  22.09.2020 रोजीच्या रात्री लोखंडी नळ कापून चोरुन नेला. अशा मजकुराच्या गंगाधर कुंभार यांनी दि. 23.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा नोंदवला आहे.


 

No comments