Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखलबेंबळी: 1)दयानंद जानोबा जगताप 2) अतुल जगताप 3) राहुल जगताप 4) सखुबाई जगताप, सर्व रा. भंडारी, ता. उस्मानाबाद यांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 11.09.2020 रोजी 19.00 वा. सु. गावकरी- नितीन सुधाकर सोनटक्के यांना त्यांच्या घराजवळ शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या नितीन सोनटक्के यांनी दि. 13.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


तामलवाडी: 1) सोमनाथ काळे 2) यशोदा काळे 3) अनिता काळे 4) प्रशांत पवार 5) राम काळे, सर्व रा. सावरगाव, ता. तुळजापूर यांनी पुर्वीच्या आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन दि. 13.09.2020 रोजी 19.30 वा. सु. भाऊबंद- अनिल चंदु काळे यांना गावातील बस थांब्यावर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कोयता, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अनिल काळे यांनी दि. 14.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

अपघात

तामलवाडी: दत्तात्रय नागनाथ गवळी, वय 52 वर्षे, रा. पिंपळा (बु.), ता. तुळजापूर हे दि. 12.09.2020 रोजी 20.00 वा. सु. तामलवाडी गावातील कठारे मिलसमोरील रस्त्याने पायी चालत जात होते. यावेळी एका अज्ञात वाहनाने निष्काळजीपणे, हयगईने वाहन चालवून दत्तात्रय गवळी यांना धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अपघातानंतर संबंधीत वाहन चालक घटनास्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या संकेत दत्तात्रय गवळी (मयताचा मुलगा) यांनी दि. 13.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ)(ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments