Header Ads

उस्मानाबाद : चोरीचा मोबाईल फोन, टीव्ही, घड्याळ यांसह 2 आरोपी ताब्यात


उस्मानाबाद - चिंतामण नारायण यादव, रा. माऊली नगर, कळंब यांच्या राहत्या घराचे बांधकाम अपूर्ण असल्याने घरास दरवाजे, खिडक्या नव्हत्या. याचा फायदा घेउन अज्ञात चोरट्याने दि. 08.09.2020 रोजी मध्यरात्री घरातील ओनीडा कंपनीचा टीव्ही, सॅमसंग मोबाईल फोन व भिंतीवरील घड्याळ असा एकुण 11,200/-रु. किंमतीचा माल चोरुन नेला होता. यावरुन पो.ठा. कळंब येथे भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गु.र.क्र. 233/ 2020 दाखल आहे.


या गुन्ह्याच्या तपासात स्था.गु.शा. च्या सपोनि- श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पाहेकॉ- तानाजी माळी, भागवत झोंबाडे, धनंजय कवडे, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे, पोकॉ- मनोज मोरे यांच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दतीचा अभ्यास केला. यातुन हा गुन्हा कळंब येथील राजा बाबू पवार, वय 22 वर्षे व एक अल्पवयीन बालक (विधीसंघर्ष ग्रस्त) अशा दोघांनी मिळुन केल्याचे पथकास समजले. यावरुन पथकाने आज दि. 21.09.2020 रोजी त्या दोघांस कळंब शहरातून चोरी केलेल्या नमूद मालासह ताब्यात घेउन पो.ठा. कळंब च्या ताब्यात दिले आहे.

No comments