Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल


 नळदुर्ग: महेश ज्ञानोबा भरगंडे, रा. येवती, ता. तुळजापूर यांनी आपल्या राहत्या घरासमोरील अंगणात ठेवलेले 11 पोती उडीद (किं.अं. 50,000/-रु.) अज्ञात चोरट्याने दि. 18.09.2020 रोजी मध्यरात्री चोरुन नेली. अशा मजकुराच्या महेश भरगंडे यांनी दि. 19.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 नळदुर्ग: राहुल ईराप्पा मुळे, रा. वत्सला नगर, अणदुर, ता. तुळजापूर यांनी स्वत:ची हिरो एचएफ डिलक्स मो.सा. क्र. एम.एच. 25 एआर 4628 ही दरवाजा नसलेल्या एका खोलीत ठेवली होती. त्याचा फायदा घेउन अज्ञात चोरट्याने दि. 16.09.2020 रोजी मध्यरात्री ती मोटारसायकल चोरुन नेली. अशा मजकुराच्या राहुल मुळे यांनी दि. 19.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

वाशी: संभाजी सुब्राव मोर, रा. सारोळा (मां.), ता. वाशी यांनी आपल्या घरासमोर लावलेली हिरो मो.सा. क्र. एम.एच. 25 वाय 0816 हिच्यासह गावकरी- भाउराव विष्णु दराडे यांच्या घरासमोरील मो.सा. चे पुढील चाक, बॅटरी व साईड पॅनल अज्ञात चोरट्याने दि. 19.09.2020 रोजी मध्यरात्री चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या संभाजी मोर यांनी दि. 19.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments