Header Ads

कळंब: विज वितरण कार्यालयाची तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखलपोलीस ठाणे, कळंब: सागर बारकुल, अमोल राऊत, परमेश्वर थोरात, कृष्णा गंभीरे, सर्व रा. कळंब यांनी दि. 01.09.2020 रोजी महावितरणच्या कळंब उपविभागीय कार्यालयासमोर मास्क न लावता, सोशल डीस्टन्सींग न पाळता विज बिल आकारणी विरोधात आंदोलन केले. आंदोलनादरम्यान त्यांनी कार्यालयातील संगणक व साहित्य, टेबल- खुर्च्या, केबीनच्या काचा यांची तोडफोड करुन कार्यालयीन कागदपत्रे फाडून शासकीय मालमत्तेचे अंदाजे 50,000/-रु. किंमतीचे नुकसान केले. अशा प्रकारे त्यांनी लोकसेवकाच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन महावितरणचे सहायक अभियंता- वैभव गायकवाड यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 353, 269 सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम- 4 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

  मारहाण

पोलीस ठाणे, आंबी: श्रीकांत भांडवलकर, रा. वाटेफळ, ता. परंडा हे दि. 30.08.2020 रोजी गावातील आपल्या शेतात उडीद पिकाची काढणी करत होते. यावेळी शेजारच्या शेताचे मालक- नामदेव गिरवले, धनंजय या पिता- पुत्रांनी बांध फोडण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन श्रीकांत यांच्या डोक्यात कुऱ्हाड मारुन व आसुडाने त्यांना मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या श्रीकांत भांडवलकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 01.09.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, आंबी: अली अब्दुल शेख, रा. कुक्कडगाव, ता. परंडा हे ‍दि. 31.08.2020 रोजी स्वत:च्या घरी होते. यावेळी गावातील- ख्वॉजा शेख यांसह त्यांची पत्नी- सुलताना, मुले- अलीम व बबलु यांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन अली शेख यांच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अली शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भा.दं.सं. कलम- 324, 452, 504, 34 अन्वये गुन्हा दि. 01.09.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments