Header Ads

जागेच्या वादावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण


 शिराढोण: आश्रुबा हरीदास साबळे, रा. वडगाव (शि.), ता. कळंब यांच्या राहत्या जागेच्या विक्री व्यवहारावरुन त्यांचा गावकरी- सतिश रामराव पवार, सुखदेव पवार यांच्याशी सन- 2013 पासून वाद आहे. त्‍या वादातून सतिश पवार व सुखदेव पवार हे दोघे भाऊ आश्रुबा साबळे यांना वेळोवेळी शारिरीक- मानसिक त्रास देत असत. आश्रुबा साबळे हे दि. 17.09.2020 रोजी 11.00 वा. सु. आपल्या राहत्या घरी असतांना नमूद दोघा पवार बंधूंनी साबळे यांच्या घरात घुसून आश्रुबा यांना जातीवाचक शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली व घरा समोरील शेड मोडून आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या आश्रुबा साबळे यांनी दि. 18.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 428, 323, 504, 506, 34 सह ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

No comments