Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार ,अवैध मद्य विरोधी कारवाई परंडा: जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन परंडा पो.ठा. च्या पोलीसांनी काल दि. 12.09.2020 रोजी वारदवाडी फाटा परिसरात छापा मारला. यात मयुरी हॉटेलच्या बाजूस असलेल्या बाळासाहेब चौधरी यांच्या शेडमध्ये 1) मनोज कटारे 2) बालाजी इंगळे 3) गणेश डोंगळे 4) बाळासाहेब कदम 5) मुकेश भोरे 6) अतुल बागल 7) सचिन ढोले 8) सुरेश काळे 9) महेश पवार 10) हरी ढेरे 11) अमर विधाते, सर्व रा. बार्शी हे तिरट जुगार साहित्यासह रोख रक्कम, 5 मोबाईल फोन व 4 मोटारसायकल असा एकुण 1,63,070/-रु. च्या मालासह आढळले.


 मुरुम: आशोक पंढरी माने, रा. येणेगूर, ता. उमरगा हा दि. 12.09.2020 रोजी येणेगूर येथील मल्हार हॉटेलच्या समोर रस्त्यावर मुंबई मटका जुगार खेळत असतांना जुगार साहित्य व रोख रक्कम 710/-रु. बाळगला असतांना पो.ठा. मुरुम यांच्या पथकास आढळला.

यावरुन नमूद 12 व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

अवैध मद्य विरोधी कारवाई

 मुरुम: मलकाप्पा खंडु गावडे, रा. अचलेर, ता. लोहारा हा दि. 12.09.2020 रोजी गावातील पाणी पुरवठा टाकीजवळ 05 लि. गावठी दारु (किं.अं. 530/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना पो.ठा. मुरुमच्या पथकास आढळला. यावरुन पोलीसांनी नमूद आरोपीविरुध्द म.दा.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

No comments