Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार, अवैध मद्य विरोधी कारवाई
जुगार विरोधी कारवाई

 बेंबळी : जुगार चालु असल्याच्या गोपनीय खबरेवरून बेंबळी पोलीस ठाण्याच्या पथकाने दि. 31.08.2020 रोजी मध्यरात्री 02.20 वा.चे सुमारास महादेव वाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या पत्रा शेड समोर छापा मारला. यावेळी महादेव वाडी येथील 1) ज्ञानेश्वर सोनटक्के 2) सुहास शिवलकर 3) माणिक खुणेकर 4) अशोक शिवलकर 5) रामेश दुधभाते हे सर्वजन दिव्याच्या उजेडात तिरट जुगार खेळताना आढळले. पोलीसांनी घटनास्थळी आढळलेले जुगार साहित्य व रोख रक्कम 4,060 रु जप्त करून  नमुद आरोपी विरूध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.अवैध मद्य विरोधी कारवाई

मुरूम : देवीदास आडे रा. भोसंगा तांडा  ता. लोहारा हे दि. 30.08.2020 रोजी जेवळी रोड आष्टामोड येथील जय भवानी चिकन सेंटर मागे अवैधपणे 30 लिटर शिंदी बाळगली असताना पो.ठा.मुरुम यांच्या पथकास आढळले.  तर दुस-या घटनेत आयाज मुल्ला रा. दस्तापूर ता. लोहारा. हे दि. 30.08.2020 रोजी दस्तापूर शिवारात पंक्चर दुकानाच्या पाठीमागे देशी दारूच्या 180 मिलीच्या 10 बाटल्या अवैध पणे बाळगले असताना पो.ठा.मुरुम यांच्या पथकास आढळले..

 नळदुर्ग : डॉ. रविंद्र पुंडे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमीक आरोग्य केंद्र काटगाव ता. तुळजापूर यांनी दि. 19.08.2020 रोजी नमुद कार्यालयात मद्यधुंद अवस्थेत धिंगाना घालुन, आरडा ओरड करून सार्वजनिक शांततेचा भंग केला. यावरून पोकॉ- लक्ष्मण शिंदे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरून म.दा.का. कलम 85 (1) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

No comments