Header Ads

जुगार , अवैध मद्य विरोधी कारवाई
जुगार विरोधी कारवाई

पोलीस ठाणे, कळंब: जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन कळंब पो.ठा. च्या पोलीसांनी काल दि. 03.09.2020 रोजी 15.20 वा. मौजे मस्सा शिवारातील आश्रुबा फरतडे यांच्या शेतातील शेडमध्ये छापा मारला. यावेळी 1)संजीवन जाधव 2)सुधाकर पवार 3)आश्रुबा मोटे, तीघे रा. मस्सा, ता. कळंब 4)तानाजी पवार, रा. मंगरुळ हे सर्वजण तिरट जुगार खेळत असतांना जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम 6,400/-रु. बाळगले असतांना पोलीसांना आढळले.

पोलीस ठाणे, तामलवाडी: हणुमंत काशीनाथ साळुंके, रा. काटी, ता. तुळजापूर हा दि. 03.09.2020 रोजी गावातील दत्त चोकात एका झाडाखाली कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 500/-रु. बाळगलेला पो.ठा. तामलवाडी यांच्या पथकास आढळला.
यावरुन नमूद व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

अवैध मद्य विरोधी कारवाई
पोलीस ठाणे, मुरुम: नाथा भाउराव सावंत, रा. येडोळा, ता. तुळजापूर हे दि. 04.09.2020 रोजी मौजे अचलेर येथील रस्त्याने सीबीझेड मोटारसायकलवरुन एका रबरी नळीमध्ये 37 लि. गावठी दारुची (किं.अं. 3,700/-रु.) अवैधपणे वाहतुक करत असतांना पो.ठा. मुरुम यांच्या पथकास आढळला. यावरुन पथकाने नमूद गावठी दारु व वाहतुकीस वापरलेली मो.सा. जप्त करुन नाथा सावंत याच्याविरुध्द म.दा.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

No comments