Header Ads

अणदूर : अवैध मद्य विरोधी कारवाईअणदूर : नळदुर्ग पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अणदूर मध्ये हातभट्टीची दारू विकणाऱ्या एका महिलेस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारून  अवैध मद्य जप्त करुन नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.


लक्ष्मी माणिक जाधव, रा. वत्सलानगर, चिवरी पाटी अणदूर, ता. तुळजापूर या दि. 14.09.2020 रोजी स्वत:च्या राहत्या घरासमोर 32 लि. गावठी दारु व देशी दारू टॅंगो पंचच्या सहा बाटल्या (किं.अं. 2,460/-रु.) अवैधपणे बाळगल्या असतांना स्था.गु.शा. च्या पथकास आढळल्या.यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपींविरुध्द  नळदुर्ग पो.ठा. येथे म.दा.का. अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.


 भुम: विमल गवळी, रा. समर्थनगर, भुम या दि. 15.09.2020 रोजी शहरातील राहत्या गल्लीत 180 मि. ली. देशी दारुच्या 9 बाटल्या (कि.अं. 630/-रु.) विनापरवाना बाळगल्या असतांना पो.ठा. भुम यांच्या पथकास आढळल्या.

  सार्वजनिक ठिकाणी गोंधळ करणाऱ्या मद्यपीवर गुन्हा दाखल

उस्मानाबाद - किशोर दत्तात्रय रेणुके, वय 29 वर्षे, रा. साईकमल हॉटेल मागे, उस्मानाबाद हा दि. 13.09.20202 रोजी 22.45 वा. सु. मद्यधुंद अवस्थेत पोलीस ठाणे आनंदनगर च्या आवारात मोठमोठ्याने आरडा ओरड करुन शिवीगाळ करत होता. यावर पो.ठा. आनंदनगर चे पोना- गोविंद खोकले यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन म.दा.का. कलम- 85 (1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

1 comment

AMBADAS V GORE said...

नळदुर्ग पोलिस स्टेशन चे मनःपूर्वक अभिनंदन.