Header Ads

तुळजापूर : रस्त्यावर लुटमार करणारे आरोपी मुद्देमालासह 36 तासांत ताब्याततुळजापूर: सुमित बळीराम मुसळे, रा. नगारवाडी, ता. लोहा हे दि. 12.09.2020 रोजी रात्री 01.45 वा. सु. तुळजापूर बायपास रस्त्याने मोटारसायकलने जात होते. यावेळी 2 अनोळखी व्यक्तींनी सुमित मो.सा. आडवी लाउन सुमित मुसळे यांना शिवीगाळ, दमदाटी करुन त्यांच्याजवळील रोख रक्कम 5,230/-रु., विवो मोबाईल फोन व खरेदी केलेले तीन टी-शर्ट जबरीने चोरुन नेले होते. यावरुन भा.दं.सं. कलम- 392, 504, 506 अन्वये गुन्हा पो.ठा. तुळजापूर येथे दाखल आहे.

            नमूद गुन्हा तपासात तुळजापूर पो.ठा. च्या पोनि- श्री हर्षवर्धन गवळी यांच्या पथकातील- पोना- सोनवणे, बनसोडे, पोकॉ- अमोल पवार, माळी यांच्या पथकाने गतीमान चक्रे फिरवली. गुन्हा केल्याची पध्दत व खबऱ्याने दिलेली माहितीच्या आधारे तुळजापूर शहरातील आरोपी- 1) अभिषेक भोसले, रा. आंबेडकर चौक 2) नागेश खडके, रा. वेताळनगर यांना काल दि. 13.09.2020 रोजी ताब्यात घेउन चोरी केलेला नमूद मुद्देमाल त्यांच्या ताब्यातून जप्त केला आहे.

No comments