Header Ads

उस्मानाबाद : महिलेचा विनयभंगउस्मानाबाद- : एक मजुर महिला (नाव- गाव गोपनीय) दि. 12.09.2020 रोजी 15.30 वा. सु. गावातीलच एका शेतात मजुरी काम करत असतांना त्याच गावातील एक मद्यधुंद तरुण तेथे आला. त्याने त्या महिलेस अनावश्यक व लज्जास्पद विचारपुस करुन त्या महिलेचा हात पकडून तीला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या महिलेने त्या मद्यधुंद तरुणास ढकलून देउन आपली सुटका करुन घेतली. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा : अल्पवयीन मुलीचे अपहरण

उमरगा: पाणी आणण्यासाठी जाते असे सांगुन एक 16 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 30.08.2020 रोजी 19.00 वा. सु. घराबाहेर गेली. ती परत न आल्याने कुटूंबींयानी तीचा शोध घेतला असतां काही उपयुक्त माहिती मिळाली नाही. यावरुन तीचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी हपहरण केले असावे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या वडीलाच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अन्वये दि. 12.09.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

No comments