Header Ads

मनाई आदेश झुगारुन ढाबा चालु ठेवणाऱ्यावर पोलीसांतर्फे गुन्हा दाखल
पोलीस ठाणे, ढोकी: कोविड- 19 संदर्भाने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष यांच्या आदेशाने जिल्ह्यात विविध मनाई आदेश अंमलात आहेत. त्या मनाई आदेशांचे उल्लंघन करुन वाणेवाडी रस्तयावरील ‘दोस्ती ढाबा’ हा नयुम नदीम दरवान, रा. तेर, ता. उस्मानाबाद यांनी दि. 11.09.2020 रोजी 11.30 वा. सु. व्यवसायास चालू ठेवला. यावरुन नमूद आरोपीविरुध्द पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


अवैध मद्य विरोधी कारवाई

पोलीस ठाणे, नळदुर्ग: अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन नळदुर्ग पो.ठा. च्या पोलीसांनी काल दि. 11.09.2020 रोजी पोलीस ठाणे हद्दीत तीन ठिकाणी छापे मारले. यात नळदुर्ग नगरीतील बौध्दनगर येथे बसवराज बंडु जाधव, रा. नळदुर्ग हा 10 लि. गावठी दारु (किं.अं. 260/-रु.) बाळगलेला आढळला. तर दुसऱ्या घटनेत याच दिवशी तुळजापूर तालूक्यातील शिरगापुर येथे नेताजी आबाजी गायकवाड, रा. शिरगापूर हा स्वत:च्या राहत्या घरासमोर बॅरल मध्ये 75 लि. गावठी दारु (किं.अं. 4,500/-रु.) बाळगलेला तर याच गावात विकास लक्षमण चिचाळे हा स्वत:च्या राहत्या घरा समोर 35 लि. शिंदी दारु (किं.अं. 1,050/-रु.) बाळगला असतांना आढळला.
यावर पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद 3 व्यक्तींविरुध्द म.दा.का. अंतर्गत पो.ठा. नळदुर्ग येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.

 अल्पवयीन मुलाचे अपहर

पोलीस ठाणे, शिराढोण: हरीओम रमेश महाजन, वय 15 वर्ष, रा. शिराढोण, ता. कळंब हा दि. 07.09.2020 रोजी 07.00 वा. सु. घरा बाहेर गेला. तो लवकर घरी परतला नसल्याने कुटूंबींयानी त्याचा शोध घेतला असतां काही उपयुक्त माहिती मिळाली नाही. यावरुन अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्याचे हपहरण केले असावे. अशा मजकुराच्या अपहृत मुलाच्या चुलत्यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अन्वये दि. 11.09.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

No comments