Header Ads

उस्मानाबाद : आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखलपोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): मोहन दासु मगर, वय 60 वर्षे, रा. वरुडा, ता. उस्मानाबाद यांनी दि. 03.09.2020 रोजी 08.30 वा. सु. आपल्या शेतातील आंब्याच्या झाडास दोरी बांधुन गळफास घेउन आत्महत्या केली होती. मोहन मगर व त्यांचा भाऊबंद- राजेंद्र वामन मगर यांच्यात वडीलोपार्जीत शेतजमीनीवरुन वाद आहे. यातुन 1)राजेंद्र वामन मगर 2)रंजना वामन मगर 3)बापुराव राजाभाऊ तनमोर, रा. सारोळा (भि.), ता. उस्मानाबाद 4)मारुती सोपान जगदाळे, रा. माढा, जि. सोलापूर हे सर्वजण मोहन मगर यांना शेतमालकीच्या कारणावरुन त्रास देत होते. तसेच शेती कसण्यास मज्जाव करत होते. त्यांच्या या त्रासास कंटाळून मोहन मगर यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या महेश मोहन मगर (मयताचा मुलगा) यांनी आकस्मात मृत्यु क्र. 46 / 2020 सी.आर.पी.सी. कलम- 174 च्या चौकशीत दिलेल्या निवेदनावरुन नमूद 4 व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 306, 34 अन्वये गुन्हा दि. 10.09.2020 रोजी नोंदवला आहे.


अल्पवयीन मुलीचे अपहरण

उस्मानाबाद जिल्हा: किराणा सामान आणते म्हणुन एक 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 06.09.2020 रोजी 05.30 वा. सु. घरा बाहेर गेली. कुटूंबींयानी तीचा शोध घेतला असतां काही उपयुक्त माहिती मिळाली नाही. यावरुन तीचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी हपहरण केले असावे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या वडीलाच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अन्वये दि. 11.09.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.


चोरी

पोलीस ठाणे, तुळजापूर: रामेश्वर नागनाथ नन्नवरे, रा. माऊलीनगर, तुळजापूर यांनी आपली हिरो हंक मो.सा. क्र. एम.एच. 25 एए 1212 ही दि. 09.09.2020 रोजी रात्री 10.00 वा. घरासमोर लावली होती. ती दुसऱ्या दिवशी सकाळी लावल्या ठिकाणी त्यांना आढळली नाही. यावरुन अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या रामेश्वर नन्नवरे यांनी दि. 11.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

  मारहाण

पोलीस ठाणे, तुळजापूर:  महादेव बळीराम मस्के, रा. बारुळ, ता. तुळजापूर हे दि. 09.09.2020 रोजी 20.30 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर झोपले होते. यावेळी भाऊबंद- 1) तानाजी नागनाथ मस्के 2) बालाजी नागनाथ मस्के 3) बायमा मस्के यांसह गावातील- 4) गोविंद सगर 5) नवनाथ कांबळे व अन्य 4 व्यक्ती यांनी बेकायदेशीर जमाव जवमवून मागील भांडणाच्या कारणावरुन महादेव मस्के यांना लोखंडी गज, काठीने मारहाण करुन जखमी केले. महादेव यांना वाचवण्यास आलेल्या पत्नी, भावजय, भाऊ यांसही शिवीगाळ, मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या महादेव मस्के यांनी दि. 10.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 143, 147, 148, 149, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments