Header Ads

कळंब : चोरी करतांना चोर दुकान मालकाच्या ताब्यात

पोलीस ठाणे, येरमाळा: आश्रुबा राऊत, रा. वाघोली, ता. कळंब यांचे घरालगतच छोटेसे चप्पल दुकान आहे. दि. 10.09.2020 रोजी रात्री 02.00 वा. सु. दुकानाजवळ संशयास्पद आवाज आल्याने त्यांनी तेथे जाउन पाहिले. यावेळी गावातीलच राजेंद्र घोंगडे हा दुकानाचे कुलूप तोडून दुकानतील चप्पल- बुट जोड असा सुमारे 5,560/-रु. माल चोरुन नेत होता. आश्रुबा राऊत यांनी त्यास पकडून येरमाळा पोलीसांच्या ताब्यात दिले. अशा मजकुराच्या आश्रुबा राऊत यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
चोरी
पोलीस ठाणे, तुळजापूर: सुवर्णा इंगळे, यांच्या तुळजापूर शहरातील ‘जिजाऊ मेडीकल्स’ च्या शटरचा कडी- कोयंडा अज्ञात चोरट्याने दि. 10.09.2020 रोजी पहाटे तोडून मेडीकलच्या गल्ल्यातील सुमारे 20,000/-रु. रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या सुवर्णा इंगळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, नळदुर्ग: महादेव कुताडे, रा. फुलवाडी, ता. तुळजापूर यांनी आपली स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. एम.एच. 25 एआर 2561 ही दि. 30.08.2020 रोजी रात्री 11.00 वा. घरासमोर लावली होती. ती दुसऱ्या दिवशी सकाळी लावल्या ठिकाणी आढळली नाही. यावरुन अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या महादेव कुताडे यांनी दि. 10.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, शिराढोण: सुखदेव मुळे, रा. माळकरंजा, ता. कळंब यांनी आपली स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. एम.एच. 25 व्ही 7583 ही दि. 08.09.2020 रोजी रात्री 11.30 वा. घरासमोर लावली होती. ती दुसऱ्या दिवशी सकाळी लावल्या ठिकाणी आढळली नाही. यावरुन अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या सुखदेव मुळे यांनी दि. 10.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments