Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखलआंबी : अभिमान बळीराम भांडवलकर वय 53 वर्ष, रा. वाटेफळ ता. परंडा , कळंब यांनी दि. 30.08.2020 रोजी 01.00 ते 03.00 वा. सु. स्वताच्या राहते घरा समोर हिरो स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. एम.एच. 25 झेड 4863 ही लावलेली असतांना अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. अशा मजकुराच्या अभिमान भांडवलकर यांनी दि. 31.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मुरूम : विठ्ठल जाधव रा. येणेगुर ता. उमरगा यांचे येणेगुर बस स्थानका शेजारी अविनाश किराणा व जनरल स्टोअर्स हे दुकान आहे. दि. 31.08.2020 रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरटयाने दुकानाचे शटर उचकटून आतील 15 कि.ग्रा. इलायची, झंडू बामची दोन खोकी, गल्ल्यातील 8000/ रु रोख रक्कम असा एकुण 67970/ रु चा माल चोरून नेला आहे. अशा मजकुराच्या विठ्ठल जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457,380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments