Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखलउमरगा : राहुल मुंगळे, रा. उमरगा, जि. उस्मानाबाद हे दि. 30.08.2020 रोजी 18.00 वा. सु. गावातील आपल्या भास्कर कांबळे यांच्या घरी गेले होते. यावेळी कुंभार पटटी उमरगा येथील राम नागनसुरे यांने तेथे येवून जुन्या भांडणाचा वाद उकरून काढून राहुल मुंगळे यांना खुनाची धमकी देवून अश्लिल शिवीगाळ केली. तसेच त्‍यांच्या मानेवर तलवारीने वार केला असता हा वार राहुल यांनी चुकवून हातावर झेलल्याने त्यांचे हाताचे बोटास दुखापत झाली. या झटापटीत राहुल मुंगळे जमीनीवर खाली पडल्याने राम याने त्यांच्या कंबरेवर तलवारीने वार करून त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या राहुल मुंगळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपीविरुध्द दि. 31.08.2020 रोजी भा.द.स. 307,324,504,506, सह आर्म ॲक्ट कलम 4,25 नुसार गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : अक्षय जमदाडे, रा. जिजामाता नगर, तुळजापूर हे दि. 30.08.2020 रोजी 13.00 वा. सु. हडको परिसरातील मारूती मंदिराजवळ असताना गावातील सुशांत सपाटे, विश्वजित अमृतराव, शुभम राउत यासह अन्य दोन अनोळखी तरूनांनी जून्या भांडणाच्या कारणावरून खुनाची धमकी देवून शिवीगाळ करून तलवारीने मारहान करून अक्षय यांच्यावर तलवारीने वार केला परंतु हा वार अक्षय यांनी चुकवल्याने  अक्षय  यांच्या डाव्या  हाताच्या मनगटावर लागून दुखापत झाली. अशा मजकुराच्या अक्षय जमदाडे यांनी वैद्यकीय उपचारा दरम्याण दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपीविरुध्द दि. 31.08.2020 रोजी भा.द.स. 307,324,504,506, सह आर्म ॲक्ट कलम 4,25 नुसार गुन्हा नोंदवला आहे.

मुरूम : विवेकानंद मुळे रा. तुगाव ता.उमरगा हे दि. 31.08.2020 रोजी 17.30 वा. सु. शिवारातील शेताच्या कोठयावर होते. यावेळी त्यांचा भाऊ- भाऊजई ब्रम्हानंद मुळे, गुरूदेवी मुळे यांनी तेथे येवून जुन्या भांडणाच्या कारणावरून विवेकानंद यांस शिवीगाळ करून लथाबुक्यांनी, खुरप्याने मारहान करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.  अशा मजकुराच्या विवेकानंद मुळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपीविरुध्द भा.द.स. 324,504,506, नुसार गुन्हा नोंदवला आहे.

 ढोकी  : अभिमन्यु जमाले रा तडवळा ता.जि.उस्मानाबाद हे दि.31.08.2020 रोजी 1830 वाजता गावातील तांबोळी पान स्टॉल जवळील कट्टयावर बसले होते. यावेळी गावातील गजेंद्र जमाले यांने मद्यधुंद अवस्थेत तेथे येवून अभिमन्यु जमाले यांना विनाकारण  अश्लिल शिवीगाळ करून त्यांचे डोक्यात विट फेकुन मारल्यांने अभिमन्यु यांचे डोक्यास दुखापत झाली. अशा मजकुराच्या अभिमन्यु जमाले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपीविरुध्द भा.द.स. 324,323,504, नुसार गुन्हा नोंदवला आहे.

No comments