उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखललोहारा: महादेव दशरथ गरगडे, रा. मोघा (खू.), ता. लोहारा हे कुटूंबीयांस दि. 23.09.2020 रोजी 08.30 ते 24.09.2020 रोजी 08.00 या कालावधीत बाहेरगावी गेले होते. दरम्यानच्याकाळात त्यांच्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात चोरट्याने तोडून आतील रोख रक्कम 38,000/-रु. चोरुन नेले. अशा मजकुराच्या महादेव गरगडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 उमरगा: पृथ्वीराज शंकरराव पाटील, रा. बालाजी नगर, उमरगा यांनी दि. 16.09.2020 रोजी 14.00 वा. आपल्या घरासमोर हिरो होंडा मो.सा. क्र. एम.एच. 20 एटी 9388 ही ठेवली होती. ती लावल्या जागी 16.30 वा. न आढळल्याने ती चोरीस गेल्याचे समजले. अशा मजकुराच्या पृथ्वीराज पाटील यांनी दि. 23.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


उमरगा: अशोक गांधी माने, रा. आरोग्यनगर, उमरगा यांनी दि. 10.09.2020 रोजी 10.00 वा. उमरगा- गुंजोटी रस्त्यालगत असलेल्या शेताजवळ आपली हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 12 सीक्यु 3508 ही ठेवली होती. ती लावल्या जागी 12.30 वा. न आढळल्याने ती चोरीस गेल्याचे त्यांना समजले. अशा मजकुराच्या अशोक माने यांनी दि. 23.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments