Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल


तुळजापूर: तुळजापूर (खुर्द) येथील नगर परिषद प्राथमिक शाळा क्र. 3 मधील 2 वर्ग खोल्यांचा व मुख्याध्यापक कक्षाचा कडी- कोयंडा अज्ञात चोरट्याने दि. 17.09.2020 रोजी मध्यरात्री तोडून आतील टीव्ही- 1 नग, किबोर्ड- 4 नग, माउस- 4 नग, संगणक संच- 2 नग व ॲम्प्लीफायर असा एकुण 73,500/-रु. किंमतीचे साहित्य चोरुन नेले. अशा मजकुराच्या नमूद शाळेचे मुख्याध्यापक- तुकाराम दशरथ मोटे यांनी दि. 18.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

  तुळजापूर: दिनेश बबन शिंदे, रा. दयानंद नगर, तुळजापूर यांचे शहरातील लातुर रोड परिसरात ‘सिध्दी मोबाईल शॉप’ आहे. दि. 07.08.2020 रोजी दुपारी 03.00 वा. बंद केलेले दुकान त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी 09.00 वा. उघडले. यावेळी दुकानाच्या छताच्या पत्र्याचे नट-बोल्ट काढून पत्रा उचकटून दुकानातील विवो व सॅमसंग कंपनीचे नवीन मोबाईल फोन- 16 नग, ब्ल्युटूथ हेडफोन- 5 नग, पॉवर बँक- 4 नग तसेच दुरुस्तीस आलेले 2 मोबाईल फोन असा एकुण 52,250/-रु. चा माल अज्ञात चोरट्याने चोरुन नेला असल्याचे दिसले. संबंधीत मोबाईल फोनच्या खरेदी पावत्या प्राप्त करण्यास उशीर लागल्याने दिनेश शिंदे यांनी आज दि. 19.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद (ग्रा.): छात्तीसगढ राज्यातील रायपूर येथून पोहे घेउन उस्मानाबादकडे येत असलेला ट्रक क्र. एम.एच. 13 सीयु 9772 हा दि. 18.09.2020 रोजी रात्री 11.00 वा. आळणी फाटा येथील ‘रामदेवरायका ढाबा’ येथे थांबला होता. ट्रक चालक- सागर देशमुख व त्यांचा मदतनीस- मनोज शिंदे, दोघे रा. पंढरपूर हे ट्रकच्या केबीनमध्ये विश्रांती करत होते. मध्यरात्री 02.00 वा. त्यांना ट्रकवर अंथरलेले टारपोलीन फाडून दोरी तोडली असल्याचे दिसले. ट्रकमधील मालाची खात्री करता प्रत्येकी 30 कि.ग्रॅ. वजनाची 23 पोती पोहे किं.अं. 23,000/-रु. ही अज्ञाताने चोरुन नेल्याचे दिसले. अशा मजकुराच्या सागर देशमुख यांनी दि. 19.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments