Header Ads

पोलीसांच्या कर्तव्यात अडथळा आणनाऱ्यावर गुन्हा दाखलपोलीस ठाणे, ढोकी: ढोकी पो.ठा. चे पोलीस कॉन्स्टेबल- नितीन कोतवाड हे दि. 26.09.2020 रोजी 12.00 वा. सु. ढोकी पेट्रोल पंप चौकात कार्यालयीन कर्तव्या निमीत्त उभे होते. यावेळी गावकरी- परवेज अब्दुलबारी काझी हा त्यांच्याजवळ आला. तुझा फौजदार कोठे आहे. त्याने आमच्या नातेवाईकांच्या गुन्ह्यात मदत केली नाही. दोन दिवसात त्याला बघून घेतो नाहीतर माझे नाव बदल. अशी धमकी देउन शिवीगाळ केली. याचा विरोध नितीन कोतवाड यांनी केला असता परवेज काझी याने नितीन कोतवाड यांची गचांडी पकडून त्यांस धक्काबुक्की केली. अशा प्रकारे परवेज काझी याने पोलीसांच्या कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन नितीन कोतवाड यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 332, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. 

  मारहाण.

पोलीस ठाणे, ढोकी: बाळासाहेब येसाजी सरवदे, वय 65 वर्षे, व उमेश तनमोर, दोघे  रा. सारोळा (भि.), ता. उस्मानाबाद हे दोघे दि. 20.09.2020 रोजी 14.00 वा. सु. पारधी पिढी, सारोळा येथे गेले होते. यावेळी उमेश तनमोर याने बाळासाहेब सरवदे यांच्याकडे दारु पिण्यास पैसे मागितले असता बाळासाहेब यांनी नकार दिला. यावर चिडुन जाउन तनमोर याने बाळासाहेब यांच्या डोक्यात दगड फेकून मारल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. अशा मजकुराच्या गोपाळ सरवदे (जखमीचा भाऊ) यांनी दि. 26.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 326 सह ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

No comments